- जाहिरात -spot_img
breaking news

राडा होणारच, राज्य गप्प बसणार नाही; खा. राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा

मुंबई | नगर सह्याद्री
खासदारांनी आमच्या समोर शपथ घेतल्या, कोणी आई, कोणी मुलीची तर कोणी साईबाबांची शपथ घेतली. पण अर्ध्या रात्री गायब झाले. आता गद्दार खासदारांना सोडणार, राज्य आता गप्प बसणार नाही. आम्ही आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे, असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना दिला आहे.

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आज संजय राऊत, गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. जुन्या स्टाईलनं फुटीर नेत्यांना खडेबोल सुनावले. जे खासदार उद्धव ठाकरेंच्या चेहर्‍यावर आणि मशाल चिन्ह्यावर निवडणून आले त्यांना अशा बेईमानी करण्याचा अधिकार नाही. त्यांना असं सोडून जाणं ते सोपं नाहीये. उद्धव ठकारेंना सोडून जाणार्‍यांच्या रक्तात बेईनामी असल्याचं राऊत म्हणाले.

एका खासदारान तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकानं आईची दुसर्‍यानं मुलीची शपथ घेतली आणि निम्म्या रात्रीच गायब झाले. एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोन करून मला महाराष्ट्रातील खासदारांची विक्री होत असल्याचं सांगितलं. प्रत्येकाला ५०-५० कोटी रुपये देण्यात आलेत. त्यातील अ‍ॅडव्हन्स म्हणून १५ कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर चाटर्ड प्लेन दिल्लीला नेण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा :  विखे फॅक्टर मुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! : आ. प्राजक्त तनपुरे, नेमकं काय म्हणाले पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ