- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव, किती मिळाला पहा…

पारनेर बाजार समितीत १५ हजार गोणी कांद्याची आवक; सभापती गंगाराम बेलकर
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी कांद्याची मोठी आवक झाली असून, दर्जेदार कांद्याला प्रति क्विंटल १४०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. दिवसभरात एकूण १५ हजार २४२ गोणींची आवक झाली असून, बाजार समितीच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण ८ हजार १८५ क्विंटल कांद्याची विक्री झाल्याची माहिती पारनेर बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, उपसभापती संदीप सालके यांनी दिली.

बाजारपेठेत कांद्याच्या प्रतवारीनुसार दरामध्ये मोठी तफावत दिसून आली. उत्कृष्ट दर्जाच्या ५ ते १० वक्कल कांद्याला १३०० ते १४०० रुपये भाव मिळाला, तर नंबर १ च्या कांद्याला ११०० ते १२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मध्यम दर्जाचा म्हणजेच नंबर २ चा कांदा ८०० ते १००० रुपये आणि नंबर ३ चा कांदा ६०० ते ७०० रुपयांनी विकला गेला. सर्वात कमी दर्जाच्या कांद्याला २०० ते ५०० रुपये भाव मिळाला असून, गोलटा आणि गोल्टी कांद्याला ५०० ते १००० रुपयांचा दर मिळाला.

यावेळी बाजार समितीचे सचिव आणि संचालक मंडळाने शेतकर्‍यांना मोलाचा सल्ला दिला आहे. बाजार समितीत शेतमालाची विक्री जाहीर लिलाव पद्धतीने होत असून, मालाच्या गुणवत्तेनुसारच भाव ठरवला जातो. जर शेतकर्‍याला मिळालेला भाव परवडणारा नसेल, तर लिलाव स्थगित करण्याचा अधिकार शेतकर्‍याला देण्यात आला आहे. तसेच, कांद्याची योग्य प्रतवारी करून आणि निवडून एकसारखा माल विक्रीसाठी आणल्यास चांगला भाव मिळतो, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. मोंढा पद्धतीमुळे मालाची किंमत कमी होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते, त्यामुळे शेतकर्‍यांनी लिलावाच्या वेळी स्वतः उपस्थित राहून आपल्या मालाची योग्य विक्री करून घ्यावी, असे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

प्रतवारी करून कांदा विक्रीला आणावा
पारनेर बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या कांद्याची आवक समाधानकारक असून, दर्जेदार मालाला १४०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. शेतकर्‍यांनी आपला कांदा विक्रीला आणण्यापूर्वी त्याची नीट प्रतवारी करावी, जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळेल. शेतकर्‍यांनी स्वतः हजर राहून लिलावात सहभागी व्हावे. पारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवून शेतकर्‍यांचे आर्थिक हित जोपासणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
– गंगाराम बेलकर, सभापती, बाजार समिती, पारनेर

हे सुद्धा वाचा :  शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ