- जाहिरात -spot_img
breaking news

शरद पवार जंतर मंतरवर; राहुल गांधी, प्रियंका गांधींचा मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलात देशभराती तरुण सामील झाले आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा सीजेपी तसेच इतर आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा विरोधक संसदेत उपस्थित करताना दिसत आहेत. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असतानाच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच विरोधी पक्षातील बडे नेते जंतर-मंतरवर जाणार आहेत. हे सर्व महत्त्वाचे नेते सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह इतरही आंदोलकांची भेट घेणार आहेत.

दिल्लीमध्ये काय घडतंय?
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विरोधी बाकावरील काँग्रेस तसेच इतर पक्षाच्या नेत्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलकांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर नेते हे जंतर-मंतरच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी सत्ताधारी मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांकडून धरपकड सूर
एकीकडे हे बडे नेते आक्रमक झाल्याचे दिसताच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. मोदी यांच्या निवासस्थानावर ठिय्या मांडलेला असतानाच काही नेत्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या भूमिकेवरही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांची गुंडागर्दी सुरू आहे, असा आरोप या आंदोलक नेत्यांकडून केला जातोय. दुसरीकडे खासदार शरद पवार हे जंतर-मंतरवर पोहोचले असून त्यांनी अभिजित दीपके यांची भेट घेतली आहे. त्यांनी दीपके यांना काय मदत हवी आहे, अशी विचारणा केली आहे. अभिजित दीपके आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ संवाद झाला असून दीपके यांनी पोलिसांनी किती अन्याय केला, याबाबतची माहिती पवार यांना सांगितली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा :  अवैध सावकारी आली अंगलट ...कारण काय

शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट
जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला आहे. ‘सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना डिटेन केलंय एकप्रकारे. आमच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. दिल्ली आणि मुंबईतील. प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपये द्यावे, सर्व आंदोलकांवरील देशातील एफआयआर मागे घ्या तसेच वांगचुक यांना सोडा. ही आमची मागणी आहे, आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी यावेळी शरद पवार यांना म्हटलं.

दरम्यान यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात ३० महत्त्वाच्या जिल्ह्यात आंदोलन झालं. कोणताही कॉल नसताना हे आंदोलन झालं. तुम्हाला काय मदत पाहिजे, तसेच तुम्ही किती दिवस आंदोलन करणार आहात? असा सवालही यावेळी शरद पवार यांनी दीपके यांना केला. यावर बोलताना दिपके म्हणाले की, ३१ दिवसांपासून इथे आहे. एक महिना झाला. काल जे झालं त्यामुळे सरकारचा राग आला आहे. आम्ही काय मागत होतो. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो, असं दिपके यांनी यावेळी म्हटलं.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ