- जाहिरात -spot_img
breaking news

ओव्हरटेकच्या नादात भाविकांच्या मिनी ट्रॅव्हलचा साकत घाटात भीषण अपघात, २० जण जखमी…

संरक्षक कठडा तोडून वाहन खड्ड्यात; चौघे गंभीर, 20 जण जखमी
जामखेड | नगर सह्याद्री
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हलला साकत घाटात भीषण अपघात झाला. घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने मिनी ट्रॅव्हलने संरक्षक कठड्यासह दिशादर्शक फलकाला धडक देत थेट खड्ड्यात पलटी घेतली. या अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले असून, सुमारे 20 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला.

बऱ्हाणपूर येथील सुमारे 22 भाविक मिनी ट्रॅव्हल भाड्याने करून मुक्ताईनगर, शेगाव, औंढा नागनाथ, तुळजापूर येथे दर्शन घेऊन जेजुरी-पुण्याकडे निघाले होते. साकत घाटातून प्रवास सुरू असताना चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले  आणि मिनी ट्रॅव्हल  थेट संरक्षक कठड्यावर आदळली. कठडा तोडून वाहन खाली खड्ड्यात कोसळले.अपघातानंतर घटनास्थळी एकचआरडाओरडा सुरू झाला. अनेक प्रवाशांच्या हातापायांना दुखापती झाल्या, तर काहींचे डोके फुटले. काही प्रवासी वाहनाच्या काचा फोडून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात वंदना कैलास महाजन, योगिता ज्ञानेश्वर महाजन, अनिल काशिनाथ महाजन व चालक गौरव महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नगर येथे हलविण्यात आले. त्यापैकी वंदना महाजन व योगिता महाजन यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पुण्यात पाठविण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातातील अनेकांना मुका मार लागला असून काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

रस्ता रुंदीकरणाची मागणी पुन्हा ऐरणीवर
करमाळा-जामखेड-पाटोदा या मार्गाचा जागतिक बँकेच्या माध्यमातून सर्व्हे झाला असून करमाळा ते जामखेड या रस्त्यास मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. मात्र, जामखेड ते पाटोदा साकत मार्गे रस्ता तातडीने रुंद करून घाटातील धोकादायक वळणे कमी करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा :  अवकाळीचा पावसाचा नगरमध्ये तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...

धोकादायक वळणांमुळे अपघातांची मालिका
सध्या जामखेड-पंचदेवालय ते सौताडा रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक साकतमार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, साकत घाट अरुंद असून घाटातील वळणे धोकादायक आहेत. त्यामुळे अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालकांना वळणांचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

साकत घाट अपघातांचा ‌‘हॉटस्पॉट‌’
साकत घाटात यापूवही अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि वाढती वाहतूक यामुळे हा घाट धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घाटरस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षाव्यवस्था वाढवावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ