- जाहिरात -spot_img
breaking news

शेतकरी आक्रमक, नगर-कल्याण महामार्ग ठप्प होणार!; काय घडलं पहा

हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरणार | टाकळी ढोकेश्वर परिसरात आंदोलनाची जय्यत तयारी
पारनेर | नगर सह्याद्री
कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे रोजी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

पारनेर तालुयातील टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते आणि नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले जाणार आहे यामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टाकळी ढोकेश्वर परिसरातील  गावांमध्ये रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या बैठका होत आहे. या बैठकांच्या माध्यमातून आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे.सध्या बाजारात कांद्याला मिळणारा भाव अत्यंत कमी असून शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, निर्यातबंदी कायमस्वरूपी हटवावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीपंपांचे वीज बिल माफ करावे आणि पीकविम्याची रक्कम तातडीने मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. रवींद्र राजदेव यांनी या आंदोलनाबाबत माहिती देताना सांगितले की, शेतकरी सध्या आर्थिक संकटात असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या बेतात आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना दिलासा दिला नाही, तर हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल.या रस्ता रोको आंदोलनासाठी शेतकर्‍यांनी कांद्याच्या माळा घालून आणि ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून चर्चेचे प्रयत्न झाले असले तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे कांदा उत्पादकांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये बैठका
टाकळी ढोकेश्वर परिसरातील पिंपळगाव रोठा, वडगाव सावताळ, सावरगाव, नांदूर पठार, काटाळवेढा, पळसपूर, म्हसोबा झाप, पोखरी, खडकवाडी, देसवडे या भागात नगर- कल्याण महामार्गावर कांदा प्रश्नी रवींद्र राजदेव यांचे नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात येणार आहे. आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असून, प्रत्येक गावात बैठका घेऊन आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने हजारो शेतकरी ट्रॅक्टर बैलगाडीसह रस्त्यावर उतरणार आहेत.

हे सुद्धा वाचा :  कांद्याला प्रति किलो 17 ते 18 रुपये भाव.. कुठे झाले लिलाव
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ