- जाहिरात -spot_img
breaking news

अनधिकृत फेरबदल भोवणार; १६९ गाळेधारकांना जप्ती नोटीसा, आयुक्तांचा कडक इशारा

महानगरपालिकेकडून कारवाई सुरू, १५ मार्चची डेडलाईन / तात्काळ थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून फेर लिलाव : आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांसंदर्भात कठोर कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेच्या मार्केट विभागाने शहरातील विविध शॉपिंग सेंटर्समधील तब्बल १६९ गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. भाड्याची मोठी थकबाकी आणि मूळ गाळ्यांमध्ये केलेले अनधिकृत बदल यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. येत्या १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास हे गाळे जप्त करून त्यांचे फेरलिलाव करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

महानगरपालिकेने शहरातील सर्व खुल्या जागा, व्यापारी संकुलांमधील गाळे, ओटे आणि शाळांच्या वर्गखोल्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अनेक गाळेधारकांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता मूळ गाळ्यामध्ये बेकायदेशीर बदल केल्याचे आढळले आहे. दोन किंवा अधिक गाळे एकत्र करणे, स्लॅब फोडून अनधिकृत जिना काढणे, पुढील जागेचा हॉटेल व्यवसायासाठी बंदिस्त वापर करणे, गाळ्यांमध्ये वाढीव बांधकाम करणे, टी-अँगल टाकून तळमजला व पहिल्या मजल्यावर बांधकाम करणे अशा व इतर स्वरूपाचे बेकायदेशीर व विनापरवाना बदल करण्यात आले आहेत.

तसेच १६९ गाळेधारकांपैकी अनेकांकडे महानगरपालिकेची सन २०२५-२६ अखेरची एकूण थकबाकी सुमारे ४ कोटी ३२ लाख रुपयांच्या घरात आहे. अनेक गाळेधारकांकडे लाखोंची थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे महानगरपालिकेने रंगभवन शॉपिंग सेंटर, सावित्रीबाई फुले शॉपिंग सेंटर (फेज-१ व २), प्रोफेसर शॉपिंग सेंटर, गंगा उद्यान शॉपिंग सेंटर, वाडियापार्क शॉपिंग सेंटर, माळीवाडा शॉपिंग सेंटर, संत कैकाडी महाराज शॉपिंग सेंटर, जुना दाणे डबरा (खुली जागा आणि शॉपिंग सेंटर), ग्राहक भांडार (पश्चिम बाजू), सिद्धार्थनगर शॉपिंग सेंटर, अमरधाम शॉपिंग सेंटर आणि कंपाउंड लगतची जागा, जनरल पोस्ट शॉपिंग सेंटर, खजूरगल्ली शॉपिंग सेंटर, छाया टॉकीज शॉपिंग सेंटर आदी संकुलातील गाळेधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १५ जून २०२६

थकबाकीदार गाळेधारकांनी १५ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, फेरबदल करणाऱ्यांनीही त्यांना आकारलेल्या दंडाची रक्कम भरावी. अन्यथा सदरचे गाळे जप्त करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सांगतानाच जप्ती कारवाईनंतर सदर गाळ्यांचे तत्काळ लिलाव करण्यात येतील, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ