- जाहिरात -spot_img
breaking news

वडगाव सावताळ येथे तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला, काय घडलं पहा

गुन्हे दाखल; लोककलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर / सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी घेतली गंभीर दखल
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडगाव सावताळ येथे बनाईदेवी यात्रोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावणारी निंदनीय घटना घडली आहे. यात्रोत्सवानिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान काही मद्यधुंद तरुणांनी तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात केवळ पुरुष कलाकारच नव्हे, तर महिला कलाकारांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.

दि. १२ एप्रिल रोजी यात्रेनिमित्त दिपाली आनंदा भोसले यांच्या तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री दहाच्या सुमारास कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच रविंद्र शिंदे, अमोल शिंदे आणि बाळू बर्डे या प्रमुख संशयितांसह इतर ४ ते ५ जण मद्यधुंद अवस्थेत स्टेजजवळ आले. त्यांनी कार्यक्रम कधी सुरू होणार यावरून सुरुवातीला वाद घातला आणि त्यानंतर अचानक सात-आठ जणांच्या टोळयाने कलावंतांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली.

हा वाद एवढ्या थराला गेला की हल्लेखोरांनी कलावंतांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या गणेश अष्टीकर भोसले यांच्यावर लोखंडी खुट्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. या टोळयाने महिला कलाकारांचे कपडे फाडून असभ्य वर्तन केले. केवळ शारीरिक इजा करूनच हे हल्लेखोर थांबले नाहीत, तर त्यांनी तमाशातील ऑर्गन, ढोलकी, माईक, मिसर आणि साऊंड सिस्टिम यासारख्या वाद्यांची आणि साहित्याची तोडफोड केली. या तोडफोडीत कलावंतांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. या भयंकर प्रकारामुळे कलावंतांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अखेर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे लोककलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामीण भागात अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा :   श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटमध्ये दोन कोटी 44 लाखांची फसवणूक

संगमनेर तालुक्यातही मारहाणीची घटना
१ एप्रिल रोजी संगमनेर तालुयातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत कलावंतांना बेदम मारहाण केल्याने आठजण जखमी झाले होते. कलावंतांचा विनयभंग केला होता. याप्रकरणी घारगाव पोलिसांत चौघांसह अनोळखी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीही संताप व्यक्त करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच पारनेर तालुयातील वडगाव सावताळ येथे सुद्धा कलावंतांना मारहाण झाल्यामुळे कलाक्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनाला कडक कारवाईच्या सूचना
या प्रकारामुळे तमाशा कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला. या घटनेची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ