- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेर शहरातील गटारी तुंबल्या….रस्त्यावर पाणी

शहरातील अंतर्गत रस्त्यावर साचले गढूळ पाणी

पारनेर | नगर सह्याद्री
पावसाळा सुरू झाला असतानाच, पारनेर शहरातील मुख्य चौक आणि निवासी भागांमधील गटारांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांची आणि गटारांची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सध्या शहरातील बसस्थानक परिसर, राहुलनगर, संभाजीनगर, आणि इंदिरानगर, कृषी उत्पन्न बाजार समिती रोड या प्रमुख भागांमधील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक कचरा, टाकाऊ वस्तू आणि जंगली झुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी गटारे पूर्णपणे तुंबली असून, पाण्याचा प्रवाह ब्लॉक झाला आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर पहिल्याच मुसळधार पावसात हे पाणी रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे.
विशिष्ट भागांचा विचार केला तर महानगर बँक समोर या गजबजलेल्या भागात पाणी साचल्यास वाहतुकीची कोंडी होऊ शकते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समोरील मैदान येथे पाणी साचल्यास परिसराला डबक्याचे स्वरूप येईल.शहरातील अंतर्गत रस्त्यावर गढूळ पाण्याचे तळे साचले आहेत. शिक्षक बँक परिसर व्यापारी भागात पाणी साचल्यास नागरिकांच्या दुकानात पाणी शिरण्याचा धोका आहे.गटारांमध्ये पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातच प्लास्टिक कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा योग्य गतीने होत नाही.

शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी पारनेर नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता, युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी. पावसाची पहिली सर येण्याआधी सर्व अडथळे दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे.
प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे

दरवर्षी पावसाळ्यात गटारे तुंबल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागतात. यंदा प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूवच आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर करून ही स्वच्छता पूर्ण करावी जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
– कल्याण थोरात, चिटणीस, भाजप.

हे सुद्धा वाचा :  अवैध घुसखोरीविरोधात 'सकल हिंदू समाजा'चा एल्गार; प्रशासनविरोधात उतरणार रस्त्यावर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ