कान्हूरपठार परिसरात जिओ, बीएसएनएल रेंज गायब; संतप्त गावकर्यांनी टॉवरला ठोकले कुलूप
कान्हूरपठार | नगर सह्याद्री
कान्हूरपठार आणि पठार भागावर गेल्या अनेक दिवसांपासून जिओ, बीएसएनएल मोबाईल कंपनीचे नेटवर्क मध्ये बिघाड झाल्याने वारंवार नेटवर्क खंडीत होत आहे. अनेक वेळा तोंडी सुचना देऊनही खंडीत होणार्या सेवत काहीही फरक होत नसल्याने अखेर कान्हूरपठार येथील संतप्त गावकर्यांनी एकत्र येऊन जिओ, बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरला कुलुप ठोकुन आपला संताप व्यक्त केला. जर कंपनीने चांगली सेवा दिली नाही तर कायमस्वरूदी हा टॉवर बंद करण्याचा इशारा दिला आहे.
संपूर्ण पठार भागावार अनेक ग्राहक जिओ, बीएसएनएल कंपनीचे आहेत त्यांचा दैनंदिन व्यवहार हा याच मोबाईल कंपनीच्या माध्यमातून होत असतो आपल्या आर्थिक गरजा, शैक्षणिक, शासकिय, बँकिंग, ग्रामस्थांना शेतीसाठी माहिती, याच मोबाईलच्या माध्यमातुन मिळत असती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य विषयक काही आपत्कालीन प्रसंगी या सेवेचा प्रामुख्याने वापर होत असतो. परंतु सातत्याने दोन तीन वर्षीपासून कधी विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तर कधी टॉवरमध्ये बिघाड झाल्याने मोबाईल सेवेवर त्याचा गंभीर परिणाम होत असून अनेक तक्रारी करुण देखील जिओ कंपनीने या तक्रारी कडे कानाडोळा केला आहे. नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्विकारून टॉवरला टाळे ठोकले. आंदोलनात जानताराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब चत्तर, ग्रामपंचायत सदस्य गणेश तांबे, श्रीकांत ठुबे, बाबासाहेब गायखे, धनंजय ठुबे, अंकुश सोनावळे, सुनिल भालेकर, अप्पासाहेब सोनावळे, सर्जेराव लोंढे, के. पी सोनावळे, अंकुश सोनावळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
…तर कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार ः सरपंच ठुबे
कान्हुरपठार व पठार भागावर मोठ्या प्रमाणावर जिओ, बीएसएनएल कंपनीचे ग्राहक आहेत. मोठ्या लोकसंखेचे गाव असल्याने परिसरातील अनेक ग्रामस्थ महिला आपल्या बँकेच्या कामासाठी तसेच शासकीय ऑनलाईन सेतु सुविधा कामांसाठी गावामध्ये येत असतात. परंतु गेल्या दीड- दोन वर्षापासून मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. यात सुधारणा झाली नाही तर सर्व ग्राहकांच्या वतीने ग्राहक न्यायालयात दाद मागणार असून कंपणीच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कान्हूर पठारच्या सरपंच संध्याताई किरण ठुबे यांनी दिला आहे.