- जाहिरात -spot_img
breaking news

पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार ! ३६ जिल्ह्यांचा अंदाज समोर; कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे. जुलै अखेर म्हणजेच पुढील चार दिवस विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विदर्भाला ऑरेंज अलर्ट; २९ आणि ३० जुलैला जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम असेल. या काळात येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाची संततधार
२८ ते ३१ जुलै या संपूर्ण चार दिवसांच्या कालावधीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घाटमाथ्यावरून प्रवास करताना विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

२८ जुलै २०२६
यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, जळगाव, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

२९ जुलै २०२६
ऑरेंज अलर्ट (Orange Alert ): गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

यलो अलर्ट (Yellow Alert) : नाशिक, नाशिक घाट, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग.

३० जुलै २०२६
ऑरेंज अलर्ट (Orange Alert): चंद्रपूर.

यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

हे सुद्धा वाचा :  पारनेरच्या उपबाजारासाठी जागा देण्यास विरोध; माजी सरपंच शिवाजी खिलारी आक्रमक

३१ जुलै २०२६
यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, वर्धा आणि यवतमाळ.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ