- जाहिरात -spot_img
breaking news

भोंदूबाबा खरातला झटका; संस्‍थानच्या पाण्‍याचे आरक्षण तातडीने रद्द करण्‍याचे आदेश, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा…

लोणी / नगर सह्याद्री –
शिवानिका संस्‍थानला दारणा प्रकल्‍पातून पाणी देण्‍याचा आदेशाची संपूर्ण चौकशी करण्‍यात येणार असून, हे पाण्‍याचे आरक्षण तातडीने रद्द करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात हा निर्णय झाल्‍यामुळे खरात किती उच्‍चपदस्‍थांच्‍या संपर्कात होता हे सुध्‍दा आता उघड झाले असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

ना. विखे पाटील म्‍हणाले की, शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्‍या तत्‍परतेमुळेच खरातांचे कारनामे उघड झाले आहेत. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभिर दखल घेवून आरोपीला लुकआऊट नोटीस काढल्‍यामुळे खरात कुठेही पळून जावू शकला नाही. या सर्व प्रक्रीयेमध्‍ये अहिल्‍यानगरचे पोलिस अधिक्षक, शिर्डीचे अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक आणि पोलिस उपअधिक्षकांसह त्‍यांच्‍या सर्व टिमने अतिशय संयमाने केलेल्‍या तपासामुळेच यासर्व घटना उघड होवू शकल्‍या. शिर्डी पोलिसांनी तयार केलेल्‍या पुराव्‍यांवरच आता नाशिकचे पोलिस तयास करीत आहेत. पोलिसांच्‍या कर्तृत्‍वावर मला शंका नाही परंतू येवढ्या मोठ्या घटना घडत असताना नाशिकचे पोलिस प्रशासन काय करीत होते असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

समाज माध्‍यमांमध्‍ये प्रसारीत झालेल्‍या फोटोबाबत स्‍पष्‍टीकरण देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, तत्‍कालिन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्‍ये दर्शनासाठी आले होते. त्‍यानंतर ईशान्‍यश्‍वर मंदिरामध्‍ये दर्शनासाठी गेले होते. पालकमंत्री या नात्‍याने मला त्‍यांच्‍या दौ-यात बरोबर राहावे लागले. त्‍यांची पुजा होईपर्यंत मी स्‍वत: जिल्‍हाधिकारी आणि जिल्‍हा पोलिस अधिक्षकांसमवेत मंदिरा बाहेर थांबून होते. त्‍यामुळे खरातांशी माझा कुठला संपर्कही नाही. मात्र धर्माच्‍या नावाखाली निरापराध महिलांचे शोषण करणा-या नराधमास ऊशिरा का होईना अटक झाली. यासाठी नेमलेल्‍या विशेष चौकशी पथकातून अधिक माहीती समोर येईल. महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रुपाली चाकणकर यांच्‍या राजीनाम्‍याचे स्‍वागत करुन, यापुर्वीच त्‍यांनी राजीनामा द्यायला पाहीजे होता अशी प्रतिक्रीयाही मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

हे सुद्धा वाचा :  महाराष्ट्रात दोन ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होण्याची शक्यता
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ