- जाहिरात -spot_img
breaking news

तरुणाला सासरवाडीत जाणे पडले महागात, अल्पवयीन मुलीचा विवाह अन अत्याचार, तरुणावर हल्ला…

सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या आणि माहेरच्या अशा एकूण सात जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संगमनेर तालुयातील शिदोडी येथे घडली असून, गुन्हा पुढील तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेचे वडील पेत्रस बाबुराव साळवे, आई जयश्री पेत्रस साळवे, मध्यस्ती सुरेखा संतोष शिंदे (सर्व रा. मुकीदपुरा, नेवासा फाटा), सासरे रावसाहेब पुंडलिकराव गायकवाड, सासू संगिता रावसाहेब गायकवाड, दीर रवी रावसाहेब गायकवाड आणि पती गोपीनाथ रावसाहेब गायकवाड (सर्व रा. शिदोडी, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह गोपीनाथ गायकवाड याच्याशी लावून दिला. लग्नानंतर शिदोडी येथे सासरी असताना पती गोपीनाथ याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पीडितेच्या सासूनेही तिला उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळ घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा तपास आता तिकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जुनाट वादातून तरुणावर हल्ला
तिघांविरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील निर्मलनगर येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तुम्ही चौकात जयंती कशी साजरी केली असा जाब विचारत आरोपींनी अक्षय शहाजी कांबळे या तरुणावर लाकडी दांडयाने हल्ला केला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमनाथ गिते, अशोक गिते, दीपक तांदळे आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  व्हिजिटिंगकार्डपुरते न ठेवता पदाला न्याय द्या : कामाच्या माध्यमातून पदाला न्याय द्या” - आ. संग्राम जगताप

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय कांबळे हे तपोवन रोडवरील महाराष्ट्र बँकेसमोर असताना आरोपींनी त्यांना अडवले. मागील भांडणाची कुरापत काढून आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी तीन मोटारसायकलवरून येत अक्षय यांना थांबवले आणि सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी केल्याचा राग धरून लाकडी दांडयाने मारहाण सुरू केली. या हल्ल्यात अक्षय यांच्या पाठीवर, खांद्यावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली आहे.मारहाणीदरम्यान सोमनाथ गिते याने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैनही तुटून गहाळ झाली आहे. घटनेनंतर अक्षय कांबळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. दिलंकर करत आहेत.

तरुणाला सासरवाडीत जाणे पडले महागात
अहिल्यानगर : बुरुडगाव येथील एका तरुणाला आपल्या मुलांना भेटण्यासाठी सासरी जाणे महागात पडले आहे. आपल्या पोटच्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पित्याला पत्नीसह सासरच्या पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडयाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काटवण खंडोबा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मुन्ना गणी पठाण हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी मागील पाच वर्षांपासून मुलांसह माहेरी राहते. घटनेच्या दिवशी मुन्ना पठाण हे आपल्या दोन मुलांना भेटण्यासाठी सासरी गेले होते. त्यावेळी तिथे असलेल्या त्यांच्या पत्नीने व सासूने तू इथे का आलास? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नीने फोन करून आपले वडील व भावाला तिथे बोलावून घेतले. विवाहितेचे वडील सिराज पठाण, भाऊ सफिराज पठाण, सासू राईसा पठाण आणि भावाची पत्नी यांनी मुन्ना यांना घेराव घालून लाकडी दांडयाने मारहाण केली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

हे सुद्धा वाचा :  पोलिस सांगून ज्येष्ठाला लुटले, जुन्या वादातून जेऊरमध्ये राडा, कृपाल आश्रमात दानपेटी फोडली, पोलिसांना टीप दिली... ड्रायव्हरवर हल्ला कुठे काय घडलं पहा

ग्रामपंचायत समोर राडा
अहिल्यानगर: सार्वजनिक ठिकाणी मद्याचे सेवन करून आरडाओरड करणार्‍या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खातगाव टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास खातगाव टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आरोपी सचिन आबासाहेब सातपुते (वय ४३, रा. खातगाव टाकळी, ता. जि. अहिल्यानगर) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. आरोपीने मद्याच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून बेशिस्त वर्तन केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ