तातडीने चारा डेपो, टँकर सुरू करण्याची मनसेची मागणी
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा व पाण्याचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनेच्या वतीने पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे व मान्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जनावरांचा चारा, पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या जनावारांसाठी तातडीने चारा डेपो व छावणी सुरू करावी, पशुधन वाचवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत, आदी प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, पारनेर शहर अध्यक्ष सतीश म्हस्के, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, बाबु कोठावळे, सूरज गोरे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.










