- जाहिरात -spot_img
breaking news

आता खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना बसणार चाप….शेवगाव पोलीस निरीक्षक यांनी घेतला निर्णय

सडकसख्याहरी विरोधात पोलीस निरीक्षक बोरसे ॲक्शन मोडवर

शेवगाव | नगर सह्याद्री
शेवगाव तालुक्यात खोटे गुन्हे तसेच गोमांस तस्करी व रोडरोमियांच्या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून नुकताच पदभार घेतलेले पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी याबाबत गंभीर पाऊले उचलली आहेत.

वेगवेगळ्या कारणावरून खोटे गुन्हे दाखल करण्यास शेवगाव तालुका अग्रेसर झाला आहे. असे गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी राजकीय दबावांचा वापर केला जातो अथवा काही पोलिसांना हाताशी धरून हे साध्य केल्याचे प्रकार यापूव घडले आहेत. मात्र नव्यानेच रूजु झालेले पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आता याबाबत वेगळे पाऊल उचलल्याचे निदर्शनास येत आहे. जनतेला सुरक्षितता मिळावी, यापूव झालेले अन्यायाचे प्रकार होऊ नये, यादृष्टीने पाणंद रस्ते अथवा शेतीवरून होणाऱ्या वादामुळे विनाकारण धडा शिकविण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतात. असे गुन्हे संपूर्ण चौकशी केल्याशिवाय दाखल करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

गोमांस तस्करी व वाहतूक करणाऱ्यांना सज्जड इशारा देताना अशा आरोपींवर यापुढे गंभीर गुन्हे दाखल केले जातील, जेणेकरून त्यांना कायद्याची पळवाट काढता येणार नाही. तसेच गोमांस पकडून देण्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणे, त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा किंवा हल्ला करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. असे आरोपी तडीपार करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असल्याचे बोरसे यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालय अथवा रहदारीच्या ठिकाणी महिला, मुली यांची छेडछाड केली जाते. यापुढे अशा घटना लक्षात आल्यास रोडरोमियांना पोलिसी खाक्या दाखविला जाईल. त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा रोमिआेंवर सध्या पाळत ठेवली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा :  राहुरी पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न विधिमंडळात गाजला!; काय घडलं पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ