- जाहिरात -spot_img
breaking news

ठाकरेंना धक्का! शिलेदाराला केंद्रात मंत्रिपदाची ऑफर; सात खासदार शिंदेंच्या संपर्कात?

मुंबर्ईं | नगर सह्याद्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूव दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सात खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातील एका खासदाराला मंत्रिपदाची ऑफर, तर इतरांना मानाची पदं देण्याची ऑफर शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंकडून खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय.

दरम्यान काही दिवसांपूव शिडत झालेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी दांडी मारली होती. त्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाली. याबाबत वाकचौरैंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत बोलणं टाळलं.

सूत्राच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ममता बॅनजच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. ते एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. याचमुळे केंद्रातील एनडीएचं संख्याबळ वाढणार आहे. या घडामोडींमुळं चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून केंद्रातील आपली ताकद वाढवण्याची तयारी करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षांचे नऊ खासदार विजयी झाले होते.
दक्षिण मंबई- अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, धाराशिव- ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशिम- संजय देशमुख, हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर, परभणी -संजय जाधव, नाशिक- राजाभाऊ वाझे, शिड- भाऊसाहेब वाकचौरे, उत्तर पूर्व मुंबई- संजय दिना पाटील हे विजयी झाले होते.

हे सुद्धा वाचा :  वहिनींना साथ द्या: सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला, काय म्हणाल्या पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ