- जाहिरात -spot_img
breaking news

शिरूर नगरपरिषदेकडून अतिक्रमणांवर हातोडा …

177 हून अधिक अतिक्रमणे हटवली

शिरूर | नगर सह्याद्री
शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना मोकळा व सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी शिरूर नगरपरिषदेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम जोमात राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील प्रमुख बाजारपेठ व गर्दीच्या परिसरातील पत्र्याचे शेड, दुकानांसमोरील बेकायदेशीर वाढीव बांधकामे तसेच जाहिरातीचे फलक हटविण्यात आले.कारवाईमध्ये रामआळी परिसरातील मुळे हॉस्पिटल ते डंबेनाला, सुभाष चौक, हलवाई चौक, मारुती आळी या भागांचा समावेश होता. तसेच पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय, बी. जे. कॉर्नर ते सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना रोड येथेही अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईमुळे मुख्य रस्ते मोकळे झाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दि. 25 व 26 मे या दोन दिवसांत एकूण 177 पेक्षा अधिक अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगररचना सहाय्यक पंकज काकड, नगर अभियंता समाधान मुंगसे, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे, सहाय्यक कर निरीक्षक दीपक कोल्हे, विद्युत अभियंता तेजस शिंदे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, स्थापत्य अभियंता शामली लाड, सहायक कार्यालयीन अधीक्षक शीतल काळे, लेखापरीक्षक दत्तात्रय टोपे, अग्निशमन अधिकारी सचिन वाळुंज, भांडारपाल भगवान दळवी यांच्यासह 100 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  उन्हाची तीव्रता वाढली; जनजीवन विस्कळीत, शेती कामांवर परिणाम, शेतकरी हवालदिल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ