- जाहिरात -spot_img
breaking news

शहरातील गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त, पोलिसांनी काय केले पहा

दोघांवर तोफखान्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना घरगुती गॅस टायांची साठवणूक आणि अवैध रिफिलिंग करणार्‍या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

गुलमोहर रोडवरील पारीजात चौकाजवळ असलेल्या एका पत्र्याच्या गोदामात हा धोकादायक प्रकार सुरू होता. याप्रप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रशांत राम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहानवाज शौकत सय्यद आणि साद अन्वर खान या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साद खान याच्या सांगण्यावरून शहानवाज सय्यद हा कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय घरगुती गॅस टायांमधून गॅस चोरून तो इतर टायांमध्ये भरण्याचे काम करत होता.

भरवस्तीत ज्वलनशील पदार्थांची अशा प्रकारे निष्काळजीपणे हाताळणी करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी या छाप्यात ११ हजार रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या १० रिकाम्या आणि १ भरलेली टाकी, २० हजार रुपये किमतीची गॅस भरण्याची इलेट्रिक मोटार यंत्रणा आणि ५ लहान गॅस टाया असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत. शहरात अशा प्रकारे अवैध गॅस विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

हे सुद्धा वाचा :  पाथर्डीत भोंदूगिरी करणार्‍यांचे खैर नाही; अंनिस आक्रमक
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ