- जाहिरात -spot_img
breaking news

ठेकेदारांचे कामबंद आंदोलन तीव्र; प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विविध प्रलंबित मागण्या आणि मागील देयके तात्काळ मिळावीत या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेले इलेट्रिकल कॉन्ट्रॅटर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, अहिल्यानगर विभाग यांचे कामबंद आंदोलन सातव्या दिवशीही तीव्रतेने सुरूच आहे. राज्यभरातील एचटी, एलटी, डीटीसी तसेच इतर सर्व प्रकारची कामे पूर्णपणे बंद ठेवून ठेकेदारांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

सात दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा निर्णय घेण्यात आलेला नसल्याने ठेकेदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली देयके अद्याप न मिळाल्यामुळे ठेकेदारांवर आर्थिक संकट कोसळले असून कामे सुरळीतपणे चालवणे कठीण झाले आहे, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली असून प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. राऊंड राबीन प्रक्रिया, एमओ-पीओ प्रणाली, बिलिंग व पेमेंट सायकल याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, तसेच सर्व प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत, या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  काळकूप येथे विनापरवाना वृक्षतोड;झाडांचा वापर कोळसा निर्मितीसाठी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ