- जाहिरात -spot_img
breaking news

‘साकळाई’ला मंजुरी मिळाल्याने शेतकर्‍यांसह, कृती समितीचा जल्लोष

सुनील चोभे / नगर सह्याद्री
श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांना वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. योजनेच्या लढ्याला यश मिळाल्याने लाभधारक शेतकर्‍यांसह कृती समितीच्यावतीने हिवरे झरे येथे जल्लोष करण्यात आला. दरम्यान, कृती समितीच्यावतीने सरकारचे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.

गेल्या ३५/४० वर्षांपासून साकळाई योजने अंतर्गत येणार्‍या गावातील शेतकरी व कृती समिती योजना मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहे. योजनेसाठी उपोषण, आंदोलन, रास्तारोकोही वारंवार करण्यात आले. नुकतेच योजना मार्गी लागण्यासाठी आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्यासाठी कृती समितीच्यावतीने गावोगावी दौरे सुरु करण्यात आले होते. तसेच तातडीने योजनेचे काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
१ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साकळाई योजनेला मान्यता मिळाली. १२३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच टेंडर प्रक्रिया होवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. चार वर्षात योजना प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे साकळाई योजनेतील लाभधारक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साकळाई योजनेच्या मंजुरीची बातमी समजताच शेतकरी व कृती समितीच्या सदस्यांनी हिवरे झरे येथे गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. दरम्यान साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पोटील यांचे आभार मानले.

यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता बबनराव वाळके, कृती समितीचे अध्यक्ष हभप बाबा महाराज झेंडे, पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भैय्या लगड, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, सुरेश काटे, उपसरपंच भाऊसाहेब निमसे, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, आकाश लंके, विनोद सोनवणे, गणेश झेंडे, प्रमोद पवार, पांडुरंग झेंडे, नवनाथ आनंदकर, रामभाऊ वाळके, भाऊसाहेब चोभे, अक्षय खेंगट, रोहिदास उदमले, रामदास झेंडे, चिखलीचे सरपंच भैय्या कदम, बापूसाहेब गाडेकर, सरपंच राजेंद्र झेंडे, सरपंच बाबासाहेब विधाटे, राजाराम घुटे, सोन्याबापु वाणी, प्रतापराव नलगे, हेमंत नलगे, डॉटर प्रतिभाताई धस, नितीन डुबल, सुभाषराव लगड, गोवर्धन कार्ले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर; घेतला हा निर्णय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ