- जाहिरात -spot_img
breaking news

जनता दरबारावरून श्रीगोंद्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप….काय घडलं

दरबार जनतेचा की पक्षाचा?

विविध मागण्यांसाठीचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील आढळगाव परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले उपोषण तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जनता दरबाराच्या विषयावरून श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.

अनिल ठवाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. तहसीलदारांसह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आंदोलकांनी वनक्षेत्रालगत मिळालेल्या जमिनींची मोजणी करून ताबा देणे, दुर्गम भागातील गावांना सुरळीत वीजपुरवठा करणे, विजेचा लपंडाव थांबवणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागण्या केल्या. याशिवाय गावातील रस्ते, शाळांसाठी इलेक्ट्रिक पोल, देण्याची मागणीही करण्यात आली.या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ, पंचायत समितीच्या माजी सदस्य अनुराधा ठवाळ, राजेंद्र म्हस्के, प्रशांत दरेकर, घुगलवडगावचे सरपंच मिलिंद कदम, श्रीकांत ठवाळ, आबा लोखंडे, रोहिदास दांगडे, रामदास दांगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उपोषण स्थगित करताना झालेल्या चर्चेत जनता दरबार या विषयावरून राजकीय टीकाटिप्पणी झाली. राजेंद्र म्हस्के व अनिल ठवाळ यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर टीका करत, जनता दरबारात केवळ एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाते, असा आरोप केला. जनता दरबार हा सर्वसामान्यांसाठी खुला असावा, तो कोणत्याही पक्षाच्या कार्यालयापुरता मर्यादित राहू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यामुळे श्रीगोंदा तालुक्यात जनतेचा दरबार की पक्षाचा दरबार? हा प्रश्न राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचा अनिल ठवाळ यांनी निषेध केला यावेळी अनिल ठवाळ यांनी सांगितले की पंचायत समितीमध्ये बचत गटांमध्ये व गाय गोठ्यात भ्रष्टाचार झाला गोरगरीब व मागासवगय यांना घरकुल मिळाली नाहीत, श्रीगोंदा तालुक्यात जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ झाला, शासकीय वाहनांचा दुरुपयोग करतात, तालुक्यामध्ये काही गावात पिण्याचे पाणी सुटले नाही आणि तीन गावांमध्ये दिशाभूल करून पाणी सुटल्याचे दाखवले आहे, या सर्व कारणांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी बिडिओ मॅडम जबाबदार आहेत अशी सडकून टीका व निषेध अनिल ठवाळ यांनी केला. व त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी केली

हे सुद्धा वाचा :  सोनईत ‘एलसीबी’ची वाळूतस्करी विरोधात कारवाई
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ