- जाहिरात -spot_img
breaking news

अशोक खरातचा नवा कारनामा; अल्पवयीन मुलालाही सोडलं नाही…काय घडलं पहा…

नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. त्याच्याविरोधात आता नववा गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी खरात याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. आरोपी खरातचे अनेक महिला आणि तरुणींसोबतचे व्हिडीओ आधीच व्हायरल झाले आहेत. आता एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर खरातने अशाप्रकारे अत्याचार केल्याचं समोर आल्याने त्याच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
पीडित अल्पवयीन मुलगी मुळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी ती अशोक खरातच्या संपर्कात आली होती. आरोपी अशोक खरात याने “माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी शंकराचा अवतार आहे” असं सांगत मुलीला आपल्या जाळ्यात ओढळलं होतं. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी तन-मन-शांतीसाठी विशिष्ट पूजा करावी लागेल, असं खरातने मुलीला सांगितलं होतं.

मुलीचा विश्वास संपादन केल्यानंतर अशोक खरातने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची तक्रार स्वत: अल्पवयीन मुलीनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा पीडितेनं ही तक्रार दिली. एका अल्पवयीन मुलीनं आता समोर येऊन अशोक खरातचा पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने अशाप्रकारे इतरही अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत अघोरी कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

२४ मार्चला आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी वकिलाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्याने किमान पाच नरबळी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. अशोक खरातच्या फार्महाऊसवर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथे पोलिसांना एक बंदूक, २१ जिवंत काडतुसे आणि पाच वापरलेली काडतुसं आढळून आली होती. ही पाच काडतुसं लोकांचा बळी देण्यासाठी वापरली असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  ’गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ; ढोल, टाळ, मृदंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ