- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यात चांगला पाऊस पडू दे! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा; ‘माने दाम्पत्य’ ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर / नगर सह्याद्री :
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा पंढरपुरात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता ही महापूजा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडली. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजाला सुखाचे दिवस यावेत, चांगला पाऊस व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, अशी प्रार्थना केली.

​या शासकीय महापूजेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही रांगेतील एका निष्ठावंत वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे शेतकरी श्री. बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दांपत्याला यंदाचे ‘मानाचे वारकरी’ म्हणून पूजा करण्याचा सन्मान लाभला. विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने माने दांपत्याने अत्यंत भावूक होऊन आनंद व्यक्त केला.

बा विठ्ठला राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव..राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे असे साकडे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज (ता.25) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने ( रा.गौरगांव ता.कळंब जि. धाराशिव) या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. बाळासाहेब माने ( वय 70) हे शेतकरी असून ते गेल्या 20 वर्षा पासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतात. यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत. मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हा रांगेत प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून निवड केली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते. आज पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस व इतर कुटुंबीय मंदिरात पोहचले. अडीच वाजता त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर माता रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सहाव्यांदा विठ्ठल रुक्मिणी ची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा :  मुलीवरील अॅसिड हल्ला, चित्रा वाघ संतप्त, काय म्हणाल्या पहा

त्यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्य पूजा संपन्न‌ झाली. रूक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते तर पाद्य पूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली.

यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे तीस लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने व टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. आषाढी एकादशीच्या पर्वकाळातील स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांची दाटी झाली आहे. तर पंढरीला आज भक्तीचा महापूर आला आहे.

संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार, महाद्वार येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. तर प्रदक्षिणा मार्गावर नगर प्रदक्षिणेसाठी दिंड्यांनी गर्दी केली आहे‌. पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरा पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गेली आहे. दर्शन रांगेत जवळपास 80 हजारांहून अधिक भाविक उभे आहेत.

आषाढी यात्रेच्या बंदोबस्तावेळी पोलिसाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य
पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीमय वातावरण आहे. अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पोलिसाने गोळी झाडून आयुष्य संपवलं. कामाच्या तणावातून या पोलिसाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या पोलिसाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून घेत या पोलिसाने आयुष्य संपवलं. पंढरपुरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसाने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली. कामाच्या तणावातून जवानाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असे या पोलिसाचे नाव होते. तो मूळचा परभणीच्या गंगाखेड येथील रहिवासी होता.

हे सुद्धा वाचा :  शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव, कोण काय म्हणाले पहा

ही दुर्दैवी घटना आज पहाटे अडीज वाजताच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली आहे. रामेश्वर साबणे हे संभाजी नगर येथे एसआरपीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते होते. आषाढी यात्रेनिमित्ताने ते ३ ते ४ दिवसांपासून पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिवाल्वर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ