मुंबई / नगर सह्याद्री –
‘देऊळ बंद २’ च्या घवघवीत यशानंतर प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘देऊळ बंद २’ चित्रपट २१ मे ला रिलीज झाला. ‘देऊळ बंद २’ ची टीम अनेक चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना सरप्राइज देत आहे. स्वतः प्रवीण तरडे याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या चित्रपटातून स्वामी भक्ती आणि शेतकरी जीवन यांचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपटाने मोठा इतिहास रचला आहे.
‘देऊळ बंद २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २१
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने २१ व्या दिवशी म्हणजे चौथ्या बुधवारी १,१३७ शोमधून ०.९० लाख रुपयांची नेट कमाई केली आहे. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७३.९४ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ६२.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठेल.
‘देऊळ बंद २’ ने रचला इतिहास
‘देऊळ बंद २’ चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने २०२२ साली रिलीज झालेल्या रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘देऊळ बंद २’ मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉप ५ मराठी चित्रपटांची यादी पाहा-
‘राजा शिवाजी’ १०५.६४ कोटी रुपये
‘सैराट’ ९० कोटी रुपये
‘बाई पण भारी देवा’ ७६.२८ कोटी रुपये
‘देऊळ बंद २’ ६२ कोटी रुपये
‘वेड’ ६१.२ कोटी रुपये










