- जाहिरात -spot_img
breaking news

कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?

धाराशिव / नगर सह्याद्री –
धाराशिवमध्ये कालाकेंद्रत पुन्हा मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. चोराखळी येथील कला केंद्रावर शस्त्र दरोड्याची थरारक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कालिका सांस्कृतिक कला केंद्र चालकाच्या घरी सहा जणांनी दरोडा टाकला, पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल 9 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण तिघेजण जखमी झाले आहेत.

तर निर्मला जाधव यांनी येरमाळा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार आणि महादेव विठ्ठल घुले यांचा कलाकेंद्रावर येत-जात करत होता. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते.

रविवारी ता. २ पहाटे नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे साडेतीनच्या सुमारास निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या आणि चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचं त्यांना जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असतानाच तोंडाला अर्धवट कापड बांधलेले सहा इसम घरात शिरले. त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला.

आरडाओरड केल्याने आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी निर्मला जाधव, रेखा शिंदे यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

हे सुद्धा वाचा :  शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन...; बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान, भोंदू बागेश्वरवर बंदी घाला...

दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही, असं तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला सदरील प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. फिर्यादीच्या तक्रारी वरून सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपी व महादेव घुलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे, या घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण झाली आहे, तर तिघेजण जखमी झाले आहेत. घटनेने धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ