- जाहिरात -spot_img
breaking news

इंडिगोच्या 161 प्रवाशांचा मृत्यूला चकवा; विमानाचं इंजिन फेल, पुढे काय घडलं पहा…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी खळबळ उडाली. विशाखापट्टणमहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच विमानतळावर धावपळ सुरु झाली. विमानाचं इंजिन फेल झाल्याची भीतीनं २८ क्रमांकाच्या धावपट्टीवर फुल एमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. सुदैवानं पायलटच्या समयसूचकतेमुळे आणि विमानतळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. विमानानं फुल एमर्जन्सी लँडिंग अगदी सुरक्षितपणे केलं.

इंडिगोच्या विमानाचं दिल्लीत सुरक्षित लँडिंग
आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार इंडिगोच्या ६ ई ५७९ विमानानं १० वाजून ५४ मिनिटांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २८ वर सुरक्षित लँडिंग केलं. यावेळी अग्निशमन दलाची वाहनं आणि रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. कोणत्याही दुर्दैवी घटनेचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा अलर्टवर होती. सुरुवातीच्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. या विमानात १६१ प्रवासी होते. या प्रवाशांचा जीव अगदी थोडक्यात वाचला. ते मृत्यूच्या दाढेतून परतले.

बोईंग ७३७-८०० विमान सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी दिल्लीच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत असताना इंजिनमध्ये गंभीर स्वरुपाचा बिघाड झाल्याचे संकेत मिळाले. विमान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इंजिन फेल होण्याच्या स्थितीत विमानाचं संतुलन बिघडण्याचा धोका असतो. हायड्रॉलिक यंत्रणेला फटका बसू शकतो. पायलटनं अजिबात वेळ न दवडता याची माहिती एटीसीला दिली. यानंतर १० वाजून ५३ मिनिटांनी विमानतळावर फुल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. २८ क्रमांकाची धावपट्टी हाय अलर्टवर ठेवण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  वाघोली ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर ‌‘रेडा आंदोलन...कारण काय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ