- जाहिरात -spot_img
breaking news

MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला तर मुलींमध्ये आरती अव्वल

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र लोकसेवा अयोग अर्थात एमपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाला आहे. २७ ते २९ मे यादरम्यान झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालावर सोलापूर जिल्ह्याने वर्चस्व मिळवले आहे. सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने (बैठक क्रमांक PN004038) हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. तर सोलापूर जिल्हातीलच आरती परमेश्वर जाधव (बैठक क्रमांक PN007031) या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे दिनांक २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल दिनांक ८ एप्रिल, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षेत पास झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन गुण) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

वैद्यकीय तपासणीस अनुपस्थित असलेले वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुदयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेकरिता मा. उच्च न्यायलय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र.१७४६/२०२६प्रकरणी दिनांक १८ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला आहे. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर उमेदवाराची शिफारस राखून ठेवण्यात आली आहे. सदर निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :  गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; कुठे घडला प्रकार पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ