- जाहिरात -spot_img
breaking news

वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनपा, शहर वाहतूक शाखा अ‍ॅक्शन मोडवर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता महापालिका आणि शहर वाहतूक शाखा अ‍ॅशन मोडमध्ये आली आहे. सोमवारी सायंकाळी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत दुकानदार आणि अतिक्रमणधारकांना कडक शब्दांत तंबी देण्यात आली असून, थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बाजारपेठेत बेशिस्त पार्किंग आणि वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नो पार्किंग आणि नो हॉकर्स झोन प्रस्तावित केले आहेत. सोमवारी महापालिकेचे वाहन जप्ती पथक आणि पोलिसांनी बाजारपेठेत फिरून दुकानदार, हातगाडी विक्रेते आणि वाहनचालकांना सूचना दिल्या.

रस्त्यावर अडथळा ठरणारे साहित्य, दुकानाबाहेरील पुतळे तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले.सोमवारी केवळ समज आणि नोटीस दिली आहे, मात्र उद्यापासून कोणत्याही प्रकारची सवलत न देता जप्तीची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. काही भागात पे अँड पार्क योजनाही राबवली जाणार असून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे होऊन सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  सरसकट कर्जमाफी द्या; शेतकऱ्यांना घेऊन वर्षा बंगल्यावर धडकणार, कोणी दिला इशारा पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ