- जाहिरात -spot_img
breaking news

गॅस दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन, काय आहेत मागण्या पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

केंद्र सरकारची गॅस दरवाढ, रेशनिंग आणि साठेबाजी विरोधात काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

देशात महार्गाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले ाहे. असे असतांनाच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करुन जनतेची पठाणी वसूली सुरु केली आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात घरगुती सिलेंडरचे दर ४०० रुपये होते. परंतु आता मोदी सरकारच्या काळात सिलेंडरचे भाव ९०० पर्यंत पोहोचले आहेत. सिलेंडर बुक करण्याचा कालावधी १० दिवसांवरुन १ महिना करण्यात आला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. याचा फटका विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गाला फटका बसत आहे.

गॅस साठेबाजांवर कारवाई करण्यात यावी, गॅस तुटवड्याचा फायदा घेऊन अवाजवी किमतीत गॅस विकणार्‍यांवर कावारई करावी, सर्वसामान्य नागकिर, हॉटेल्स व छोटे मोठे  व्यावसायिक यांना गॅस सिलेंडर सहपणे उपलब्ध व्हाव याची व्यवस्था करण्यात यावी, केेंद्र सरकारने वाढवलेल्या किमती तात्काळ कमी करण्यात याव्यात आणि जनतेची आर्थिक पिळवणूक थांबवावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, मयूर पाटोळे, राजेंद्र कर्डिले, गणेश भोसले, रवि सातपुते, सुनिल क्षेत्रे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहे गिते यांना दिले.

हे सुद्धा वाचा :  क्रांती चौकातील अतिक्रमणावर नगरपरिषदेचा हातोडा; महामार्गाच्या कामातील अडथळे हटवले
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ