- जाहिरात -spot_img
breaking news

फॅशन विश्वात अहिल्यानगरच्या विनल गुंदेचा यांची मोठी झेप

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
फॅशन क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत नगरच्या फॅशन डिझायनर विनल मनोज गुंदेचा यांच्या डिझाईन्सची निवड प्रतिष्ठित ‘लॅक्मे फॅशन वीक जेननेक्स्ट मार्च २०२६’ साठी झाली आहे. त्यांना या फॅशन वीकमध्ये विजेतेपदही मिळाले आहे.‌ दि. २० मार्च रोजी मुंबई येथे आयोजित लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर गुंंदेचा आपला पहिले कलेक्शन “ अ पोस्टकार्ड फ्रॉम व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ सादर करणार आहेत. पेपरपासून थ्रेड पर्यंत डिझाईन त्यांनी केले.

जुबिनव चढ्ढा या लेबलसाठी तयार केलेल्या त्यांच्या डिझाईन्सना परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली असून प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या समोर त्यांची निवड होणे हे त्यांच्या कारकिर्दीतील मोठे यश मानले जात आहे.

गुंदेचा यांनी इंडियन ॲकॅडमी ऑफ फॅशन डिझायनिंग येथे रचना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा पूर्ण केला असून स्कूल ऑफ फॅशन डिझायनिंग पुणे येथून डिग्री मिळवली आहे. सर्व शिक्षक, स्टाफचे त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे.

विनल गुंदेचा या सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा यांची नात तर जैन ओसवाल पतसंस्थेचे संचालक मनोज गुंदेचा यांची मुलगी आहे.
या यशामुळे गुंदेचा कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून विनल यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेर बाजार समितीत सत्ताधारी-विरोधक भिडले!; राजकारण तापले..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ