- जाहिरात -spot_img
breaking news

पाऊस पडण्यासाठी गाभारा जलमय…. कामरगावकरांचे महादेवाला साकडे

गावासह सर्वत्र पाऊस पडू दे… ओढे, नाले तुडुंब भरू दे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विहिरी आटून गेल्या…विंधन विहिरींचे पाणी गेले.. जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा आला. पेरण्या लांबल्यामुळे शेतकरी चहुबाजूंनी अडचणीत आला आहे. पाऊस लवकर पडावा, यासाठी गावकऱ्यांनी गावातील महादेव मंदिरात महारुद्र अभिषेक केला.

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बाजरी, मूग, तुर, सोयाबीन, मका आदी पिकांची पेरणी खोळबंली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कमरगाव येथील मा. सरपंच व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्या संकल्पनेतून गावातील पुरातन महादेव मंदिरात महारुद्र जलभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. पुरोहित रामदास गंधे यांनी विधिवत पूजन केले. टँकरने आणलेले पाणी गावातील स्त्री, पुरुष, तरुणांनी हंडा, बादली, कळशीने वाहून मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंडीवर ओतत संपूर्ण गाभारा जलमय केला. हर हर महादेवाचा जयघोष करीत आर्त हाक दिली. गावासह सर्वत्र पाऊस पडू दे… ओढे नाले तुडुंब भरू दे, अशी प्रार्थना केली.

यावेळी तुकाराम कातोरे, शामराव आंधळे, विनायक कातोरे, अनिल आंधळे, रविराज साठे,अनिल ठोकळ, शामराव साठे, पत्रकार हेमंत साठे, जगदीश ढवळे, सुभाष झरेकर, अंबादास रोहोकले, छगन कातोरे, पोपट थिटे, संदीप ठोकळ, गेनू चौरे, अप्पा खाडे, रघुनाथ वेताळ, विठ्ठल ठोकळ, संकेत चौधरी, धनूभाऊ कातोरे, दिलीप नाणेकर, भीमाबाई आंधळे, रखमा साठे, यमुना खाडे, उषा आंधळे, सुलोचना आंधळे, कल्पना महापुरे, लता साठे, कांता नाणेकर, कलावती खाडे, वैशाली मंडले, प्रमिला आंधळे, स्वराज साठे, पद्मावती शिंदे, राजेंद्र पोटे, देवांश साठे, सोपानराव शिंदे यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकभावना श्रद्धेने जतन करण्याचा मानस
पूवच्या काळी पाऊस लांबला तर गावकरी महादेव मंदिरात मोठा जलभिषेक करीत महादेवाची पिंड पाण्याने भरवून ठेवली जायची. त्यामुळे मुबलक पाऊस पडायचा, अशी लोकभावना होती. ती श्रद्धेने जतन करण्याचा आमचा मानस आहे.
-तुकाराम कातोरे, मा. सरपंच कामरगाव

हे सुद्धा वाचा :  समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; अपघातातून राडा, इन्स्टाग्रामवर तरुणीची बदनामी...

पाऊस पडण्यासाठीचा प्रयत्न यशस्वी होईल
ग्रामदैवत कामक्षा माता व भगवान नागेश्वर ही जागृत शक्ती पीठ आहेत. पावसासाठी आम्ही केलेला प्रयत्न यशस्वी होईल. यापूव गावकऱ्यांनी अनेकदा असे उपक्रम केलेले आहेत.
-रविराज साठे. चेअरमन, दूध संस्था.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ