- जाहिरात -spot_img
breaking news

राजकारणात भूकंप! ठाकरेंचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्ष प्रवेशाची तारीख ठरली

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीभेटीमागील हेच प्रमुख कारण होतं. मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीमध्ये ठाकरेंच्या खासदारांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले होते. पण आता यामधील अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवेसनेच्या संपर्कात असल्याचे समजतेय. हे खासदार लवकरच सत्तेत जाणार असल्याची माहिती खात्रालायक सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे नुकतेच दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या भेटीमध्ये शिंदेंनी आपल्या संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीत खलबतं आणि कायदेशीर चर्चा
एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात केवळ राजकीय चर्चाच नाही, तर या खासदारांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेवरही (Legal Process) बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे देखील या दौऱ्यात सहभागी होते. ठाकरे गटाचे जे खासदार संपर्कात आहेत, ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. योग्य वेळ साधून हा मोठा राजकीय बदल घडवून आणला जाण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील या चर्चेमुळे आता राज्यातील राजकारण कोणत्या दिशेला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या खासदारांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडू शकतो, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा :  राज्यावर अवकाळीच संकट! ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ