- जाहिरात -spot_img
breaking news

पक्ष सोडताच ओमराजे निंबाळकरांचा पहिला वार; आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला लागलेली मोठी गळती आता उघड झाली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पक्ष सोडण्याच्या या मोठ्या निर्णयावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली असून ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

मुलाखतीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. ओमराजे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मोठ्या धर्मसंकटात; इमोशनली चुकीचं, पण पॉलिटिकली बरोबर
पक्षांतराच्या निर्णयावर बोलताना ओमराजे भावूक म्हणाले की, “मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिक दृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर निर्णय चुकीचा वाटतो. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर बरोबर आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय अस्तित्व धोक्यात!
बंडखोरीमागचे कारण स्पष्ट करताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, “आम्ही खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तर मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीत, असे देखील ओमराजे निंबाळकर म्हणाले.

पैसे किंवा सुरक्षेच्या चर्चा खोट्या; अंतिम निर्णय 20 जूननंतर
पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपये किंवा ‘वाय प्लस’ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांचा ओमराजे यांनी कडक शब्दांत इन्कार केला. “हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. माझ्यावर शिंदेसेनेत प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. परंतु, माझे वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या कोर्टाच्या निकालानंतर, सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून मी माझा अंतिम निर्णय 20 जूननंतर जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीची थेट तारीखच सांगितली
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ