- जाहिरात -spot_img
breaking news

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; भाळवणीच्या डॉक्टरविरोधात गुन्हा

पारनेर | नगर सह्याद्री
सोशल मीडियावरून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक काशीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अपमानकारक व वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाळवणी येथील डॉ. मंगेश दत्तात्रय बेकारसे याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पारनेर युवक तालुकाध्यक्ष संकेत विनायक पटेकर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

मूळचे खारेकर्जुने (ता. जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असलेले डॉ. मंगेश बेकारसे हे वैद्यकीय व्यवसायानिमित्त सध्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कार्यरत आहेत. डॉ. बेकारसे हे नेहमीच महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करत असतात. दरम्यान, 21 मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास डॉ. बेकारसे याने आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक अत्यंत प्रक्षोभक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत अपमानकारक मजकूर लिहिण्यात आला होता. काशीराम यांच्याबद्दलही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.

हा वादग्रस्त मजकूर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, भीमसैनिक आणि पुरोगामी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. या कृत्यामुळे संपूर्ण समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्याने अखेर पटेकर यांनी पारनेर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत डॉ. मंगेश बेकारसे याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हे सुद्धा वाचा :  धक्कादायक! बिर्याणीवर कलिंगड खाणे जीवावर बेतलं ? कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ