- जाहिरात -spot_img
breaking news

मराठवाडा भूकंपाने पुन्हा हादरला; हिंगोलीत ३.५ रिश्टर स्केलचा धक्का, नागरिक भयभीत…

हिंगोली / नगर सह्याद्री :
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार हादरा बसला आहे. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी हिंगोली शहर आणि परिसराला हा धक्का जाणवला. भूमापक केंद्रावर या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वर्षभरात हिंगोलीमध्ये भूकंपाचे ७ धक्के जाणवल्याची माहिती समोर आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सकाळी अचानक बसलेल्या या धाडक्यामुळे अनेक घरांवरील पत्रे आणि भांडी वाजली.या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. मात्र, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हिंगोली आणि वसमत परिसर हा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे संवेदनशील बनला आहे. आज पुन्हा एकदा जोरदार हादरा बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक नागरिक तात्काळ आपापल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर पडले.

या भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने परिसरातील काही घरांना आणि भिंतींना भेगा पडल्याची माहिती समोर येत आहे. अनेक भागांतून घरांना तडे गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.

हे सुद्धा वाचा :  धनंजय मुंडे हे दुसरे खरात, करुणा मुंडे काय म्हणाल्या पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ