- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये सव्वा कोटींची लाल सुपारी जप्त; दोन ट्रक ताब्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कर्नाटक राज्यातून दिल्लीच्या दिशेने अवैधरीत्या वाहतूक होणारी सुमारे १ कोटी ४६ लाख १५ हजार २०० रुपये किमतीची लाल सुपारी अहिल्यानगर पोलिसांनी सापळा रचून पकडली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुपारीची मोठी खेप शहरातून जाणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या पथकाने नाकेबंदी करून दोन संशयित मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतले. तपासणी केली असता, पहिल्या ट्रकमध्ये ४५० गोण्या (३१,५०० किलो) आणि दुसर्‍या ट्रकमध्ये ३५० गोण्या (२४,५०० किलो) असा एकूण ५६ हजार किलो मुद्देमाल आढळला. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने ही कारवाई करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच राज्यकर विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, अजय नगरे, बाळासाहेब जंबे, सचिन जाधव, भरत बुधवंत, राजू जाधव, महेश मगर, किरण बनसोडे आणि सागर द्वारके यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पुरवठादारांचा शोध घेत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेर पोलीस ऍक्शन मोडवर; 42 किलो गांजा जप्त, अशी झाली कारवाई...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ