- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमधील रस्ता प्रश्नांवर शिवसेनेची आंदोलनाची भूमिका

नवीपेठ आणि सिद्धेश्वरवाडी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी |

शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांचे निवेदन

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरातील नवी पेठ परिसरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच पारनेर ते सिद्धेश्वरवाडी मार्गावरील खड्डे, खराब झालेला रस्ता आणि वाहतुकीस निर्माण झालेल्या अडचणी याबाबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली.

यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वाहनचालक, शेतकरी, विद्याथ आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.निवेदन स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीची दखल घेत लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत निंबाळकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश खोडदे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका पद्मजा श्रीकांत पठारे, उपतालुकाप्रमुख संदीप मोढवे, शुभम पाडळे, अशोक जिरेकर, संतोष चत्तर, शुभम पठारे, नितीन गंधाडे, बाळकिसन कोकाटे, दीपक देंडगे, सागर कावरे, नितीन ठुबे, सुजीर गाजरे, संदेश मोरे, गोरख औटी, कांतीलाल बोरुडे, शुभम भागवत, योगेश रासकर, मच्छिंद्र भिसे, विजय इंगळे, सारंग बोरुडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे मिडसांगवी मध्ये पहिले रिंगण
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ