- जाहिरात -spot_img
breaking news

स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

शेवगाव येथील महावितरण विभागाच्या कार्यालयात ठिय्या

बोधेगाव | नगर सह्याद्री
स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव येथील महावितरण विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महावितरण वीज वितरण कंपनीने शेवगाव शहरात व तालुक्यात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरु केली असून स्मार्ट मीटर बसविणे हे सक्तीचे नाही, अशे स्पष्ट आदेश असतानाही स्मार्ट मीटर बसवले जात असून, बिलही तिप्पटीने येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नये. ज्यांची स्मार्ट मीटरमुळे बिले जादा आलेली आहेत ते कमी करून द्यावी आणि ज्या ग्राहकाला परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविले आहेत त्यांना त्यांची मागणी असेल तर ते बदलून द्यावे, यासाठी बुधवार दि. 22 रोजी वंचित महावितरण विभागच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल शेख, उपाध्यक्ष अरुण झांबरे पाटील, युवा तालुकाध्यक्ष ऑगस्टिन गजभीव, लक्ष्मण मोरे, शेख सलीम जिलाणी, रावसाहेब जाधव, लुकास गजभिव, दिलीप वाघमारे, शेख मुन्नाभाई, ईस्माईल खान, शिवाजी कातकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आंदोलकांशी चर्चा करतांना उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे आणि शहर अभियंता भाऊसाहेब पगारे यांनी ज्या ग्राहकांना जादा बिलं आले असतील तर तपासणी करून कमी करण्यात येईल तसेच यापुढे स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जाणार नाही. असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा :  दुष्काळमुक्तीसाठी आदर्शगाव योजनेतील कामे पूर्ण करा...कोणी दिल्या सूचना
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ