- जाहिरात -spot_img
breaking news

चिडलेली नारीशक्ती विरोधी पक्षांचा सुपडा साफ करेल; भाजपने काय केले पहा…

महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व विरोधी पक्षांचा भाजपने केला निषेध
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
गेल्या ५० वर्षात काँग्रेसने देशास अधोगतीला नेले आहे. अतातही काँग्रेस व इतर विरोधी पक्ष देशाविरोधी भूमिका महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून संसदेत नारी शक्तीचा अपमान केला आहे. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. देशातील नारी शक्ती काँग्रेस व विरोधी पक्षांना कदापि माफ न करता याचा नक्कीच बदला घेईल. देशातील नारीशक्ती आता चिडलेली असून ५ राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधी पक्षांचा सुपडा साफ केल्या शिवाय त्या शांत बसणार नाहीत, असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी देऊन भविष्यात भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा नव्या जोमाने व पूर्ण बहुमताने महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडून नक्कीच पारित करतील व देशातील नारी शक्तीला न्याय मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला.

महिला आरक्षणाला विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने दिल्ली गेट येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल, बसपा, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इतर विरोधी पक्षांचा जाहीर निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नारीशक्ती जिंदाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, काँग्रेसचा पक्षाचा निषेध असो, या घोषणाबाजीने दिल्लीगेट परिसर दणाणून गेला.

या आंदोलनास युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया दानवे, ज्योती दांडगे, माजी नगरसेविका पल्लवी जाधव, रेणुका करंदीकर, ज्येष्ठ नेत्या कालिंदी केसकर, छाया रजपूत, प्रदेश कार्यकारणी सदस्य विद्या शिंदे, श्वेता पंदाडे, स्वाती शीरसुल, नगरसेविका शितल ढोणे, सुरेखा जंगम नगर तालुकाध्यक्षा अर्चना चौधरी, संजय गायकवाड अमोल निस्ताने, देवेंद्र बंब, महेश शिर्के, उदय अनभुले, अनिल गट्टानी, महेश गुगळे, नीरज राठोड, देवेंद्र दुधाले, शंकर गोरे, बाळू काळे, ज्ञानेश्वर धिरडे, लक्ष्मीकांत तिवारी, अजय ढोणे, भार्गव फुलारे, राजेंद्र फुलारे व चिन्मय पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  बंद घर फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास; हात उसने पैसे परत मागितल्याने तरुणाला बेदम मारहाण

प्रिया जानवे म्हणाल्या, देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी भाजप अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र काँग्रेस व विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करून ते महिला विरोधक असल्याचे सिद्ध केले आहे. महिलांची प्रगती होऊच नये अशी त्यांची रणनीती आहे. त्यामुळे या काँग्रेस व विरोधी पक्षांना महिला नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणर नाही. मात्र भाजप नक्कीच महिलांना न्याय मिळवून देईल, अशी मला खात्री आहे.

रुद्रेश आंबाडे म्हणाले, काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल, बसपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इतर विरोधी पक्षांनी या विधायालाका विरोध करून असुरी आनंद व्यक्त करत आहेत. महिलांना बळ देण्या ऐवजी त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच त्यांनी पोहोचली आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करत असून या विरोधकांना नक्कीच धडा शिकवू.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ