1 लाख 55 हजार रुपये किमतीचे मोबाईल
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्यावतीने हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्याची कामगिरी करण्यात आली आहे. तालुक्यातील विविध नागरिकांचे अंदाजे 1 लाख 55 हजार रुपये किमतीचे मोबाईल शोधून ते संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले मोबाईल तांत्रिक तपासाच्या माध्यमातून शोधण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी श्रीगोंदा पोलिसांचे आभार मानले. मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांमध्ये अश्विनी राजेंद्र खेडकर (बेलवंडी स्टेशन), दत्तात्रय ज्ञानदेव देवरकर (हिरडगाव), प्रतीक कैलास पारखे (सुरोडी), अनिल ज्ञानदेव प्रधान (वाघोली, पुणे), रोहन पोपट बबडकर (वेळू), अरबाज अब्दुल रज्जाक मन्सूर (लोणी व्यंकनाथ) तसेच बबन तुकाराम सांगळे (पारगाव सुद्रिक) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार सचिन गोरे यांनी केली.










