- जाहिरात -spot_img
breaking news

स्थायी सभापतीपदी लोंढे, महिला बालकल्याणच्या सभापतीपदी बारस्कर, उपसभापतीपदी सानप!

 

महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली बारस्कर, उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वर्षा सानप यांचा अर्ज दाखल

मंगळवारी होणाऱ्या सभेत निवडीची प्रक्रिया पार पडणार : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. दोन्ही समित्यांच्या पदांसाठी प्राप्त अर्जावर मंगळवारी (१० मार्च) होणाऱ्या विशेष सभेत प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला स्थायी समिती व त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, दोन्ही समित्यांच्या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक सुभाष लोंढे यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे सादर केला. या पदासाठी केवळ सुभाष लोंढे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या या उमेदवारी अर्जावर नगरसेवक मनोज कोतकर हे सूचक आहेत. तर, निखिल वारे हे अनुमोदक आहेत.

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. सभापती पदासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली नितीन बारस्कर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या या अर्जाला सुनीता किसन भिंगारदिवे या सूचक, तर अनिता विपुल शेटिया या अनुमोदक आहेत. तसेच, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या वर्षा रोहन सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर वंदना विलास ताठे या सूचक आणि रोशनी आकाश त्र्यंबके या अनुमोदक आहेत. या दोन्ही पदांसाठीही अन्य कोणतेही अर्ज आलेले नाहीत.

स्थायी समितीचे सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीचे सभापती आणि उपसभापती या तिन्ही महत्त्वाच्या पदांसाठी केवळ एकेकच अर्ज दाखल झाले असले, तरी निवडणूक कार्यक्रमानुसार विशेष सभेत निवडीची प्रक्रिया पार पडेल. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेत प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा :  कलिंगड उत्पादक शेतकरी हवालदिल; दर घसरल्याने उत्पादन खर्चही निघेना
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ