- जाहिरात -spot_img
breaking news

अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम; इराणच्या १० मागण्या, ट्रम्प म्हणाले आता सुवर्णकाळ..

दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही महत्त्वाचा निर्णय

वॉशिंगटन | वृत्तसंस्था –
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या ४० दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या संघर्षाला अखेर युद्धविराम लागला आहे. दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख यांनी केलेल्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

युद्धविरामापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक कडक इशारा दिला होता. महॉर्मुझच्या सामुद्रधुनीफतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करुन दिला गेला नाही, तर ते इराणचा संपूर्ण मानववंशच नष्ट करुन टाकतील. त्यांनी इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरही हल्ले करण्याची धमकीही दिली होती.द न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानने केलेली मध्यस्थी आणि चीनने ऐनवेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे हा करार शय झाला. दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीबाबत पाकिस्तानने मांडलेला प्रस्ताव इराणने स्वीकारला.

आता सुवर्णकाळ येईल ः डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका-इराण संघर्षात आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या युद्धात इराणसहित मध्य पूर्वेतील देशांमध्ये भीषण नरसंहार झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्व आशियातील शांततेबाबत एक अत्यंत सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जागतिक शांततेसाठी हा एक मोठा दिवस असल्याचे सांगत त्यांनी इराणसोबतच्या संबंधांमध्ये नव्या पर्वाची नांदी मिळण्याचे संकेत दिले आहेत. जागतिक शांततेसाठी हा मोठा दिवस आहे! इराणला आता शांतता हवी आहे, ते संघर्षाला कंटाळले आहेत आणि जगाचीही तीच भावना आहे. विशेषतः व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत काय ठरलं?
या करारानुसार, अमेरिका आणि इस्रायल आपले हल्ले थांबवतील. इराणही आपले हल्ले थांबवेल. या कालावधीत इराणच्या लष्कराच्या मदतीने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकर्स, वायू वाहतूक करणारी जहाजं आणि इतर नौकांची सुरक्षित आवकजावक सुनिश्चित केली जाईल. युद्धबंदी कराराच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या सैन्याला हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर साधारण दोन तासांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याने सर्व लष्करी तुकड्यांना गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले. ही शस्त्रसंधी लेबनॉनसह इतर प्रदेशांनाही लागू होईल. यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील औपचारिक चर्चा १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सुरु होतील.

हे सुद्धा वाचा :  राज्यसभा गाजवली, देशभर चर्चा, पण तरीही आपची राघव चड्डांवर कारवाई; नेमकं कारण काय?

हल्ले थांबवण्याचे निर्देश
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आलेल्या एका निवेदनात, लष्कराच्या सर्व शाखांना सर्वोच्च नेत्यांच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि गोळीबार तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवेदनात हे देखील स्पष्ट करण्यात आले की, यामुळे हा संघर्ष संपुष्टात आलेला नाही, तर ही केवळ एक तात्पुरती उपाययोजना आहे. असे असले तरी, लष्कराच्या सर्व तुकड्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इराणच्या १० मागण्या
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिकेने स्वीकारलेल्या या प्रस्तावात १० प्रमुख अटींचा समावेश आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील हिंसाचाराला बंदी, हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण कायम राखणे. इराणच्या अणु-समृद्धीकरण अधिकारांना मान्यता. अमेरिकेचे सर्व प्राथमिक निर्बंध उठवणे. त्रयस्थ देशांवर परिणाम करणारे सर्व दुय्यम निर्बंध उठवणे. इराणविरुद्धच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांची समाप्ती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मंडळाच्या सर्व ठरावांची समाप्ती. इराणला झालेल्या नुकसानीपोटी नुकसानभरपाई अदा करणे. प्रदेशातून अमेरिकेच्या लढाऊ दलांची माघार आणि लेबाननमधील हिजबुल्लाहसारख्या, इराण समर्थक गटांचा समावेश असलेल्या संघर्षांसह-सर्व आघाड्यांवरील युद्धाची समाप्ती. हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्याशी संलग्न युद्धबंदी. या अटींची स्वीकृती एका तात्पुरत्या तणाव-निवारण कराराशी जोडलेली आहे. या करारानुसार, इराणने दोन आठवड्यांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून नियंत्रित वाहतुकीला परवानगी देण्याचे मान्य केले आहे. त्या बदल्यात, अमेरिकेने आक्रमक लष्करी कारवाया थांबवल्या आहेत. ज्यात इराणी पायाभूत सुविधांवरील हल्ले वाढवण्याच्या धमयांचाही समावेश आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ