- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न, चोरट्यांचा धुमाकूळ…

निघोज | नगर सह्याद्री
निघोज एसटी बसस्थानक परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास केला आहे. तसेच बसस्थानक परिसरातील एक औषधाचे दुकानही फोडले असून या दुकानातून काही औषधे तसेच साधारण दोन हजार रुपयांची चोरी झाली आहे.

एटीएम चोरीचा हा प्रकार काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित बँक अधिकार्‍यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या चोरीची माहिती घेण्यासाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक नितीन खंडागळे तसेच नगर येथील विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी याची पाहणी केली. याबाबत सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

एसटी बसस्थानक परिसरात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांना ते अर्धवट सोडून द्यावे लागले. तसेच औषधाचे दुकानही फोडले असून, काही औषधे व दोन हजार रुपये रोख रक्कम चोरण्यात आली आहे. एसटी बसस्थानक परिसरात हा अतिशय रहदारीच्या ठिकाणी हा चोरीचा प्रकार झाल्याने लोकांनी या चोरीची दहशत घेतला. याबाबत पोलिसांनी या चोरट्यास तातडीने पकडण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी निघोज आणि परिसरातील चोर्‍यांना पायबंद घालण्यासाठी रात्रगस्त सुरू करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

हे सुद्धा वाचा :  टाकळी ढोकेश्वर आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करा ...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ