- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी पोटनिवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी मोहीम काटेकोरपणे करा -‌ खर्च निरीक्षक व्ही. कुमार

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीस अवघे सहा दिवस शिल्लक असताना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षपणे व संवेदनशीलतेने काम करावे. तपासणी मोहीम अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांनी दिले.

​राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित खर्च आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, लेखाधिकारी श्री. नागरे, उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

​खर्च निरीक्षक व्ही. कुमार म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. अवैध रोकड व मद्य वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दिले जात नाही ना, याची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

​एफएसटी, व्हीएसटी व एसएसटी पथकांनी अधिक सक्रिय राहून मतदारसंघात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. तसेच ‘पेड न्यूज’च्या अनुषंगाने माध्यमांतील बातम्यांवर सतत लक्ष ठेवावे व समाज माध्यमांवरून राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या प्रचारावरही बारकाईने नजर ठेवावी. प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी करूनच जाहिरातींना पूर्वप्रमाणीकरण देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, निवडणूक कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून प्रभावी कामकाज करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हे सुद्धा वाचा :  "तुम तो ठहरे परदेसी' या लोकप्रिय गीताचे गीतकार कालवश
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ