- जाहिरात -spot_img
breaking news

एल निनोचा परिणाम, यंदा मान्सून कमीच..; काय आहे ‘स्कायमेट’चा अंदाज…

स्कायमेटच्या अंदाजाने बळीराजाची धाकधूक वाढली | सरासरी ९४ टक्के पर्जन्यमान होणार
नवी दिल्ली | वृत्तसंस्था

एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २०२६ मध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी मान्सून पावसाचा अंदाज देखील स्कायमेटने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मान्सून पर्जन्यमानाचा अंदाज सरासरीच्या ९४ टक्के वर्तवण्यात आला आहे.

हंगामाच्या दुसर्‍या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शयता देखील वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय हवामान विभाग पुढील आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज जाहीर करण्याची शयता आहे.
भारतात २०२६ मध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज खाजगी हवामान संस्था ’स्कायमेट’ने मंगळवारी (०७ एप्रिल) वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात ’एल निनो’ या हवामान स्थितीमुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शयता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, चार महिन्यांच्या या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या (८६८.६ मिमी) ९४ टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग पुढील आठवड्यात मान्सूनचा आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर करण्याची शयता आहे. भारतातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे ७० टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान पडणार्‍या दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील १४० कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या जून आणि जुलै महिन्यात होत असल्याने मान्सूनचे वेळेवर आगमन आणि त्याचे वितरण हे कळीचे ठरते. साधारणपणे, दक्षिण-पश्चिम मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो.

हे सुद्धा वाचा :  सोनेगाव-परांडा एसटी बससेवा अखेर सुरू....विद्यार्थी , शेतकरी व प्रवाशांची गैरसोय दूर

काय आहे ‘एल निनो आणि ला निनो’
पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणे, याला ’एल निनो’ म्हणतात. याचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतो आणि पाऊस कमी होतो. तर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्याच्या स्थितीला ‘ला निना’ म्हणतात, ज्यामुळे मान्सूनला बळकटी मिळते आणि पाऊस चांगला होतो.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ