- जाहिरात -spot_img
breaking news

लोणी बुद्रुकचे तलाठी कार्यालय चोरट्यांनी फोडले

लोणी | नगर सह्याद्री
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील मंडल व तलाठी कार्यालय बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 35 हजारांची रोकड चोरून नेली. लोणी बुद्रुक गावाच्या मध्यवत ठिकाणी असलेले मंडल व तलाठी कार्यालयाची कुलुपे तोडून अज्ञात चोरट्यांनी ड्रॉव्हर मधील 35 हजारांची रोकड चोरून नेली.

बुधवारी सकाळी कामगार तलाठी श्री. देशमुख आपल्या कार्यालयात आले असते ही घटना समोर आली. या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार, इमारत गेट व मंडल अधिकारी केबिन यांची कुलुपे चक्क चोरट्यांनी चावीच्या साह्याने उघडली. मात्र तलाठी केबिन व ऑफिस केबिनची कुलुपे तोडण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. सर्व केबिन उचकल्यानंतर त्यांना ऑफिस मधील एका ड्रॉवरमध्ये 35 हजारांची रोकड मिळाली. खातेदारांकडून आलेला सरकारी काही दिवसांचा भरणा ऑफिसमध्येच ठेवलेला होता.तो चोरट्यांच्या हाती लागला.

लोणी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी कार्यालयात येऊन माहिती घेतली. चोरीचा प्रकार लक्षात घेऊन पोलीस पुढील तपास करीत आहेत. या चोरीतील दोन घटना लक्षवेधी समजल्या जात आहेत. त्यात तीन कुलूपांच्या अचूक चाव्या चोरट्यांकडे होत्या. तर चोरी आटोपून जाताना चोरट्यांनी ही तिन्ही कुलुपे पुन्हा लाऊन घेतली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून माहितगार व्यक्तीचा यात सहभाग असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे लोणीच्या तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही बसवलेला नसल्याने चोरी करणे सोपे झाले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा :  प्राजक्त तनपुरेंच्या वाटेत काटेच काटे!; कर्डिलेंच्या बाजूने सहानुभूती!, काय घडतंय पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ