- जाहिरात -spot_img

नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ; देशातून 380 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग

5 ते 83 वर्षांच्या खेळाडूंच्या बुद्धीची कसोटी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर प्रतीकात्मक चाल देऊन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकण, सचिव यशवंत बापट, अमोल घोलप, डॉ. अमोल तांबे, सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, शाम कांबळे, अनुराधा बापट, प्रकाश गुजराथी, रोहिणी आडकर, शुभदा ठोंबरे, संजय खडके, स्वप्निल भगूरकर, नवनीत कोठारी, मनीष जसवानी, सनी गुगळे, चेतन कड, अतुल कोठारी, पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, दीपक चव्हाण, विजय ढाले, डी. बी. चौरे, शार्दुल टापसे, देवेंद्र ढोकळे, शिरीष इंदलकर, प्रशांत धंगेकर यांच्यासह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सचिव यशवंत बापट यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, जम्मू-काश्मीर तसेच महाराष्ट्र राज्यातून 380 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुद्धिबळ क्षेत्रातील नरेंद्र फिरोदिया यांच्या योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या नावाने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत अवघ्या पाच वर्षांच्या बालकांपासून ते 83 वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत विविध वयोगटातील बुद्धिबळपटू सहभागी झाले असून, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विचारशक्ती, संयम आणि नियोजन यांची कसोटी आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी, तर आभार संघटनेचे खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.

हे सुद्धा वाचा :  खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट...

 

Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com