- जाहिरात -spot_img
breaking news

सांगवीत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
सांगवी (ता. श्रीगोंदा) येथे भरदिवसा बंद घर फोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणार्‍या सराईत घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत तब्बल १६ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश उत्तमराव भोईटे यांच्या सांगवी येथील बंद घराचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

या घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. पोउपनि संदीप मुरकुटे यांच्यासह फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, मनोज साखरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे हा गुन्हा नितीन दत्तात्रय जाधव (वय ४०, रा. संजयनगर, गेवराई, जि. बीड, सध्या रा. हनुमान नगर, दौंड रोड, अहिल्यानगर) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने चोरीतील काही दागिने स्वतःच्या घरात लपवून ठेवले होते, तर काही दागिने सराफ व्यवसायिकाला विकल्याचे उघड झाले.

पोलिसांनी आरोपीच्या घरातून ८ लाख २३ हजार २६० रुपये किमतीचे ७७ ग्रॅम ६२० मिली वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप जप्त केले. तसेच सराफ व्यवसायिकाकडून ८ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ७० ग्रॅम ३९० मिली सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या कारवाईत एकूण १६ लाख ५९ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये १४८ ग्रॅम ०१ मिली सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉपचा समावेश आहे. दरम्यान, आरोपी नितीन जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात बारामती, इंदापूर, यवत, पंढरपूर आणि गेवराई पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर करून अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; घुले पाटलांची सत्ता कायम
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ