- जाहिरात -spot_img
breaking news

भाजप योग्य व्यक्तिला योग्य संधी देणारा पक्ष, काय म्हणाले पालकमंत्री विखे पाटील, सभापती राम शिंदे…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील / भाजपच्या चार नवनिर्वाचित आदारांचा सत्कार
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जिल्ह्यातून एकाच वेळी चार आमदार विधान परिषदेवर जाने ही मोठी ऐतिहासिक घटना आहे. या नव्या आमदारांच्या माध्यमातून जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळाले आहे. सर्वांच्या अशा अपेक्षांची पूर्तता व जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत योगदान देत जिल्हा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या वरही आहे. भारतीय जनता पार्टी ही योग्य व्यक्तिला योग्य सुवर्णसंधी देणारी आहे. राज्यातील महायुती सरकार खूप विशाल आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाची गंगा कायम खळखळ वाहणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपाच्या ४ नवनिर्वाचित आमदारांच्या नागरी सत्काराचे समारंभ आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यात अहील्यानगरचे भूमीपुत्र व विधान परिषदेचे नूतन सदस्य आ.सुनिल कर्जतकर, आ.विवेक कोल्हे व आ.प्राजक्त तनपुरे तसेच राहिरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आ.अक्षय कर्डिले यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अध्यक्ष स्थानाहून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जिल्ह्यातील महायुतीचे आ.संग्राम जगताप, आ.काशिनाथ दाते, आं.अमोल खताळ, आ.विठ्ठल लंघे, आ.विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेट टायरवाले, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह महायुतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मंत्री विखे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील विविध महत्वच्या विकास कामांसाठी सुमारे २६२४ कोटी रुपयांचा मोठा विकास निधी दिला आहे. यातून निळवंडे धरण, साकळाई योजना, ताजनापुर लिफ्ट, वांबोरी चारी, मुळा व गोदावरी कालवा अशी मोठी प्रकल्प मार्गी लागली आहेत. यांचे पूर्णपणे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आहे. त्यांनी जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईपोटी १६०० कोटी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रुपये राज्य सरकारने दिले. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात एव्हढा मोठा निधी कधीही मिळाला नाहीये. या सर्व कामांची व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कमी न पडता नागरिकांमध्ये जाऊन त्यांना सांगितले पाहिजे. विरोधक टीका करत बुद्धिभेद करत आहेत तर काही पंढरपूर येथे उपोषणाची नौटंकी करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  महामार्ग दिशादर्शक फलकावरील जुनी नावे तात्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

आमदार सुनील कर्जतकर म्हणाले, एकेकाळी अहिल्यानगर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या राज्यातील बलाढ्य जिल्हा होता, राज्यातील राजकारण हलवणारे उत्तुंग बलाढ्य नेते जिल्ह्यात होते, पण शेजारच्या जिल्ह्यातील एका साखर सम्राटाने जिल्ह्याची पूर्ण वाट लावली. आता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून जिल्ह्याचे प्रतिष्ठा व वजन वाढवून त्या राजकीय डीएनए ला फुंकर घालून जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करावे, असे सांगून भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देऊन दिलेल्या सुखद धक्क्याच्या घटना क्रमाची माहिती त्यांनी दिली.

यावेळी अक्षय कर्डिले, विवेक कोल्हे यांनीही मनोगत व्यक्त करून संधी दिल्याबद्दल पक्षाचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले .शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी आभार मानले.

झेडपी व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकवा : सभापती राम शिंदे
नव्या ४ आमदारांमुळे जिल्ह्यातील आमदारांची संख्या आता १८ वर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा वेग वाढणार आहे. नवनिर्वाचित आमदार सुनील कर्जातकर यांनी पक्षाचे संघटन मजबूत करत आयुष्यभर निष्ठेने काम केले. याची पावती म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत निष्ठेने काम करत राहावे. पक्ष निश्चितच उचित दखल घेईल. भविष्यात राज्यात डी लिमिटेशन मुळे मतदार संघांची पुर्नरचना होनारच आहे. आमदारांची संख्याही वाढणार आहे, त्यामुळे अनेकांना संधी मिळण्याची शक्यता आहे, येणाऱ्या झेडपी व पंचायत समिती निवडणुकांमध्येही याच पद्धतीने विजय मिळवून महायुतीचा झेंडा फडकवा, असे आवाहन सभापती राम शिंदे यांनी केले. नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे, आ.प्राजक्ता तनपुरे, आ. अक्षय कर्डिले यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ