- जाहिरात -spot_img
breaking news

वाघोली ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर मुंडन आंदोलन…नेमकं काय झालं

समृद्ध पंचायतराज अभियानातील मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह | गटविकास अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी

शेवगाव | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत वाघोली ग्रामपंचायतीवर अन्याय झाल्याचा आरोप करत, शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयासमोर थेट मुंडन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासन आणि शासनाचा तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शेवगाव पंचायत समिती परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

वाघोली ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शासनाने निश्चित केलेल्या विविध निकषांनुसार ग्रामविकास, लोकसहभाग, श्रमदान, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, स्वच्छता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यापूव गावाला माझी वसुंधरा अभियान 0.2/0.3 अंतर्गत प्रथम पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यामुळे एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असतानाही, समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नाही आणि वाघोलीवर अन्याय करण्यात आला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे निकषनिहाय गुणांकन तातडीने जाहीर करावे. मूल्यांकन समितीचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल (विझिट रिपोर्ट) उपलब्ध करून द्यावा. संपूर्ण प्रकरणाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

या आंदोलनाला वाघोली परिसरातील विविध गावांच्या सरपंचांनीही उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी आंदोलनस्थळी येत ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. हे आंदोलन भाजप कार्यकर्ते उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी उमेश भालसिंग यांनी स्वतःही मुंडन करून घेतले.

पुरस्कारासाठी लाखो रुपयांची मागणी ः भालसिंग
आंदोलनादरम्यान वाघोलीच्या सरपंच सुश्मिता भालसिंग यांचे पती व भाजप कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी थेट निरीक्षक समितीवरच लाचखोरीचे गंभीर आरोप केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पुरस्कारासाठी गावात आलेल्या निरीक्षक समितीच्या काही प्रतिनिधींनी पुरस्कारासाठी लाखो रुपयांची आर्थिक मागणी केली होती. आम्ही ही लाचेची रक्कम देणे नाकारल्यामुळेच हा पुरस्कार जाणीवपूर्वक दुसऱ्या गावाला वळविण्यात आला आहे. या आरोपांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा :  अजितदादांच्या विमान अपघाताची अपडेट समोर; व्हीएसआर कंपनीच्या मालकाने थेट नावचं घेतलं...

मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करणार
येत्या 31 मे रोजी पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड) येथे मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. पुढील दोन दिवसांत वाघोली ग्रामपंचायतीच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक निर्णय न झाल्यास, थेट चौंडी येथे मुख्यमंत्र्यांच्या समोर अधिक तीव्र स्वरूपात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा वाघोलीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ