- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये जिल्हा बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं…

लॉक न तुटल्यामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला | माळवाडीत महिला मजुराचे सोन्याचे गंठण लांबविले
पारनेर | नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भर ग्रामपंचायत चौकातील अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. बँकेचे कुलूप तोडण्यात अपयश आल्यानंतर, या चोरट्यांनी मोर्चा माळवाडीकडे वळवत तेथे झोपलेल्या एका महिला शेतमजुराच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेले. या दुहेरी संकटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास जवळा येथील मुख्य चौकात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवर दोन चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेच्या मुख्य सेफ्टी डोअरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तुटले नाही. त्याच वेळी रस्त्यावरून जाणार्‍या एका वाहनाचा उजेड पडल्यामुळे चोरट्यांनी पकडले जाण्याच्या भीतीने तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

बँकेतून रिकाम्या हाती परतल्यानंतर या भुरट्या चोरट्यांनी जवळच असलेल्या माळवाडी परिसरात मोर्चा वळवला. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे तेथे कामानिमित्त बाहेरून आलेले ९ ते १० शेतमजूर घराबाहेर झोपले होते. गाढ झोपेत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले. हिसका बसताच संबंधित महिला व इतर मजूर जागे झाले. त्यांनी आरडाओरडा करत चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु अंधाराचा आणि झाडीझुडपांचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, हे चोरटे स्थानिक भागातीलच भुरटे चोर असावेत. त्यांच्याकडे कोणतेही घातक हत्यार असल्याचे दिसून आले नाही. मात्र, भर चौकातील बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापार्‍यांमध्ये आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यापूर्वीही परिसरात शेतकर्‍यांच्या विहिरींवरील विद्युत मोटारी, केबल आणि शेतीचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. वाढत्या चोर्‍यांमुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, रात्रीच्या वेळी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जवळा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा :  ‘अपने अपने राम' कथेने अहिल्यानगर बनले राममय ; शहरातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यास हजारोंची उपस्थिती

पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढविण्याची गरज
जवळा परिसरात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला असून, बँक फोडण्यापर्यंत त्यांचे धाडस वाढले आहे. परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. हे चोरटे स्थानिक असण्याची दाट शयता असून, पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त तातडीने वाढवावी आणि या गुन्हेगारांचा बंदोबस्त करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक जवळा परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ